
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा OMG 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. अक्षय कुमार याच्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला अक्षयचा सेल्फी हा चित्रपट देखील फ्लाॅप गेला.

OMG 2 या चित्रपटामध्ये अक्षय कुमार याने तगडी फिस घेतली आहे. शिवदूतची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार याने तब्बल 35 कोटी रूपये फिस घेतल्याचे सांगितले जात आहे.

पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार याच्यासोबतच यामी गौतम हिने OMG 2 या चित्रपटासाठी तब्बल 8 कोटी फिस घेतली आहे. आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे करणार आहे.

OMG 2 या चित्रपटासाठी पंकज त्रिपाठीने देखील मोठी फिस घेतली आहे. पंकज त्रिपाठीने 5 कोटी रूपये या चित्रपटासाठी घेतले आहेत.