“मी त्यांच्या बेडरूममध्ये…”, आलिया भट्टला आहे इतरांच्या घरात डोकवयाची वाईट सवय

Alia Bhatt: आलिया भट्टने नुकताच एका मुलाखतीमध्ये स्वत:च्या एका वाईट सवयीचा खुलासा केला आहे.

| Updated on: Mar 09, 2025 | 4:56 PM
1 / 5
सध्या बॉलिवूडच्या अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे आलिया भट्ट. ती कायमच तिच्या वैयक्तीक आयुष्यासोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आलियाने तिच्या वाईट सवयी विषयी सांगितले आहे.

2 / 5
आलिया भट्टने नुकताच जय शेट्टीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये तिने तिला अटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्ह डिसऑर्डर (ADHD) आणि एंग्झायटीची समस्या असल्याचे सांगितले आहे.

3 / 5
तसेच तिने सांगितले की, जेव्हा एखादा दिवस हा वाईट जातो तेव्हा ती बाल्कनीमध्ये उभं राहून इतर लोकांच्या घरात पाहाते.

4 / 5
“अनेकदा मी काय करते, खासकरून जेव्हा माझा दिवस वाईट असतो. माझ्या बेडरूमच्या मागे एक लहान बाल्कनी आहे. फायर एस्केपसारखी, मी तिथे जाऊन एकटीच उभी राहते. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल. पण माझ्या घराच्या आजूबाजूच्या इमारती एकमेकांच्या अगदी जवळ असल्याने मी इतर लोकांच्या घरात सहज पाहू शकते” असे आलिया म्हणाली.

5 / 5
पुढे आलिया म्हणाली, “मी त्या छोट्या बाल्कनीमध्ये जाऊन उभी राहते. मला वेगवेगळ्या लोकांच्या घरात घडत असलेल्या गोष्टी दिसू लागतात. कोणी कपडे घालून घरातच फिरत असते, तर कुणी टीव्ही पाहत असते. मी त्यांच्या बेडरूममध्ये डोकावत नाही, पण त्यांच्या घरात पाहिल्याने मला जीवनाचं अस्तित्व मला जाणवतं.”