
उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे तुमच्या शरीराला जास्तीत जास्त पाणी देणे. उष्माघात टाळण्यासाठी शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच सतत पाणी पिणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात अनेकदा खूप- खूप पाणी प्यावेसे वाटते मात्र, जेवण करू वाटत नाही. परंतु अन्नाचे सेवन करणे टाळू नका. उन्हाळ्यात हलका व पौष्टिक आहाराचे सेवन करा. यामुळे शरीर एनर्जी टिकून राहण्यास मदत होते.

उन्हाळ्यात घराबाहेर पडत असताना चेहऱ्याची काळजी घ्या ,चेहरा टॅन होऊ नये म्हणून सनस्क्रीन लावून मगच बाहेर पडा. त्यानंतर तीव्र उन्हापासून शरीराचे सरंक्षण करण्यासाठी सुती कपड्यांचा पेहराव करण्याला प्राधान्य द्या. घराबाहेर पडताना चेहऱ्याला सुती स्कार्फ बांधा

उन्हाळ ऋतूत शिळे अन्न खाणे टाळावे. याचे कारण म्हणजे शिळे अन्न तुम्हाला शक्ती देत नाही आणि अति उष्णतेमुळे हे अन्न तुमच्या शरीरात जाऊन तुमचे पोट खराब करू शकते. त्यामुळे ताज्या अन्नाचे सेवन करा. पाणीदार फळांचे सेवन करा.
