Amazon Layoff : अॅमेझॉन कंपनीचा दणका, भारतासह तीन देशात मोठी नोकरकपात, हजारो लोकांना घरी बसवलं!
या निर्णयमुळे भारत, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या तरुणांवर, त्यांच्या रोजगारावर परिणाम पडला आहे. रिटेल उद्यागात काही बदल दिवासा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

अॅमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी जगभरात कार्यरत आहे. या कंपनीच्या माध्यातून संपूर्ण जगात लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे. परंतु याच कंपनीने आता आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिलाय. कंपनीतर्फे यावेळी 1000 लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय.
या निर्णयमुळे भारत, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या तरुणांवर, त्यांच्या रोजगारावर परिणाम पडला आहे. रिटेल उद्यागात काही बदल दिवासा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.
अॅमेझॉन कंपनीच्या या निर्णयाबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार रिटेल बिझनेसमध्ये बदल घडवून आणण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या अॅमेझॉन कंपनीचा सेल सुरू आहे. हा सेल सुरू असतानाच आता नोकरकपातीचे हे वृत्त समोर आले आहे.
या नोकरकपातीचा निर्णय कंपनीच्या स्टोअर डिव्हीजनवर पडणार आहे. सोबतच कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस आणि सेलिंग पार्टनर सर्व्हिस विभागावरही या नोकरकपातीचा परिणाम पडणार आहे.
अमेरिका आणि ब्रिटमनधील काही कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. आतापर्यंत या कंपनीने 30 हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू टाकलेले आहे.