बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
अमिषा पटेल अभिनयासोबत तिच्या लूक्ससाठीसुद्धा ओळखली जाते.
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ही सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. अनेक दिवसांपासून तिने कुठलाही सिनेमा केलेला नाही.
नुकतंच अमिषा पटेलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांची येथील सिनेमा निर्माते अजय कुमार सिंग यांनी अमिषाविरोधात 2 कोटी 50 लाख रुपये परत न केल्याचा आरोप केला आहे.