
जगातील या अनोख्या गावात तुम्हाला पार्किंगमध्ये कार आणि बाईक नाही तर विमान दिसेल. हो, त्यांच्या घराच्या अंगणात एक खासगी विमान दिसेल. येथील लोक विमानातूनच बाहेर जातात.

इतकेच काय सामान खरेदी असो की स्वतःचे वैयक्तिक काम, ब्रेकफास्ट, मित्रांसोबत कुठं जेवायला जायचं असलं तरी ते विमानानेच जातात. कारण त्यांच्याकडे खासगी विमान आहे.

या गावाचे नाव कॅमरन एअर पार्क असे आहे. अमेरिकेतली कॅलिफोर्नियामधील एल डोरॅडो काऊंटीमध्ये हे गाव येते. हे गाव 1963 मध्ये वसवण्यात आले. येथे जवळपास 124 घर आहेत.

दुसऱ्या जागतिक युद्धात अमेरिकेत वैमानिकांची मोठी संख्या झाली. झटपट उड्डाण करण्यासाठी देशातील अनेक भागात एअरफील्ड तयार करण्यात आले. पण युद्ध संपल्यावर हे विमान तळ बंद करण्यात आले नाही. त्याठिकाणी मानवी वसाहत करण्यात आली. त्यातूनच हे गाव तयार करण्यात आले.

येथे निवृत्त वैमानिकांना घर देण्यात आले. कॅमरन एअर पार्क हा त्यातीलच एक आहे. या गावातील अधिकाधिक लोक वैमानिकच आहेत. येथील घरांच्या अंगणात जास्त करून खासगी विमानचं दिसून येतात.