मांजरीची करामत, करते मृत्यूची भविष्यवाणी, माणसाजवळ जाऊन बसली की….संपूर्ण जग चकित!
या जगात अशी एक मांजर आहे, जी थेट लोकांच्या मृत्यूची भविष्यवाणी करते, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे, ही मांजर त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन बसते. त्यामुळे या मांजरीची जगभरात चर्चा होत आहे.

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत. परंतु मांजर अमेरिकेच्या रोड आयलँडवरची आहे. ही मांजर लोकांचे अचूक भविष्य वर्तवते असे मानले जात आहे. ही मांजर एका नर्सिंग होममध्ये राहते. ज्या रुग्णाचा मृत्यू होणार आहे, ही मां जर त्याच रुग्णाच्या जवळ जाऊन बसते. म्हणजेच ही मांजर लोकांच्या मृत्यूचे भविष्य वर्तवते असे मानले जात आहे.

अमेरिकेतील रोड आयलँडमधील अर हाऊस नर्सिंग अँड रिहॅबिलिटेशन सेंटरच्या डिमेन्शिया यूनिटमध्ये ही मांजर राहते. या मांजरीचा रंग पांढरा आहे. ती याच नर्सिंग होममध्ये सगळीकडे फिरत असते. 2000 साली या मांजरीला नर्सिंग होममध्ये आणण्यात आले होते.

ज्या रुग्णाचा मृत्यू होणार आहे, त्याच रुग्णांच्या बेडजवळ ही मांजर जाऊन बसते. एखाद्या रुममध्ये रुग्णाचा मृत्यू होणार असेल तर त्या ररुमध्येही ती जाते. त्यामुळेच ही मांजर लोकांच्या मृत्यूची भविष्यवाणी करते असे मानले जात आहे.

या मांजरीला तेथील डॉक्टरांनी एका रुममधून दुसऱ्या रुममध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ज्या खोलीत रुग्णाचा मृत्यू होणार होता, त्याच खोलीत ती मांजर जाऊन बसत होती. आता ती मांजर लोकांच्या मृत्यूचे भविष्य सांगते असे बोलले जात आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.