Govinda : सर्व बाजूंनी अडचणीत आलेला गोविंदा संकटातून बाहेर पडण्यासाठी अखेर देशातील ‘या’ मंदिरात दर्शनासाठी पोहोचला
Govinda : बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा सध्या अडचणीत सापडला आहे. गोविंदावर विवाहबाह्य संबंधांचा ठपका पडला आहे. गोविंदाचं नाव सह अभिनेत्री कोमल रानी सोबत जोडलं जातय.

सुनीता आहूजाने कोमलवर घर तोडण्याचा आरोप केलाय. कोमल रानीने सुद्धा पलटवार करत गोविंदावर गंभीर आरोप केलेत. सुनीता अनेक वर्षांपासून गोविंदला मारण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप कोमल रानीने पोस्टमध्ये केला आहे.
गोविंदा, सुनीता आणि कोमल यांच्यामध्ये शाब्दीक युद्ध रंगलं आहे. या कौटुंबिक वादात गोविंदाची सून कश्मीर शाह मामी सुनीताच्या बाजूने ठामपणे उभी आहे. गोविंदाची ग्रहदशा सध्या खराब आहे. सर्वच बाजूंनी तो अडचणीत सापडला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी गोविंदाने अखेर देवदर्शनाचा मार्ग स्वीकारला आहे.
कुटुंबात सुरु असलेल्या या कलहादरम्यान गोविंदा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी महाकाल येथे पोहोचलाय. महाकाल येथून गोविंदाने व्हिडिओ शेअर केलाय. अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटर्स दर्शनासाठी उज्जैन महाकाल येथे येत असतात.
व्हिडिओमध्ये गोविंदा महाकालचा जप करताना दिसतोय. काल हर, दुख हर, दरिद्र हर, कष्ट हर, रोग हर... हर हर महादेव. व्हिडिओत गोविंदाच्या माथ्यावर टिळा असून गळ्यात फूलमाळ आहे. तो महादेवाच्या भक्तीमध्ये लीन दिसून येतोय.
गोविंदाचा चेहरा पाहून लक्षात येतय की तो व्यक्तिगत आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करतोय. त्यातून मार्ग काढण्यासाठी तो महाकालच्या शरणात आलाय. बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स, क्रिकेटर्स महाकालच्या दर्शनाला येत असतात.