Amitabh Bachchan: भरदिवसा माझी छेड काढली..; अमिताभ बच्चन यांचा अंगावर काटा येईल असा प्रसंग, स्वत:च केला खुलासा

Amitabh Bachchan News: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा शेअर केला आहे. माधुरी दीक्षितसमोर त्यांनी जी घटना बोलून दाखवली त्याने सर्वांच्या अंगावर काटा आला.

| Updated on: Nov 09, 2026 | 9:20 AM
1 / 5
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा या वयातील उत्साह आजही लोकांना लाजवतो. सध्ये ते लोकप्रिय शो कोण बनेगा करोडपती या मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये नुकतीच बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने हजेरी लावलेली.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा या वयातील उत्साह आजही लोकांना लाजवतो. सध्ये ते लोकप्रिय शो कोण बनेगा करोडपती या मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये नुकतीच बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने हजेरी लावलेली.

2 / 5

यावेळी अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा बोलून दाखवला. ते म्हणाले की," दिल्लीतील प्रसिद्ध मिरांडा हाऊस गर्ल्स कॉलेजला मी भेट दिली होती. तेव्हा एक मजेशीर पण तितकाच संवेदनशील प्रसंग घडला. जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलो. तेव्ही हॉस्टेलच्या बालक्नीमध्ये काही मुली बसल्या होत्या"

3 / 5

पुढे म्हणाले,"अमिताभ यांना पाहून बाल्कनीतील मुलींनी माझी छेड काढायला सुरुवात केली. माझ्या चालण्याच्या पद्धतीवर त्या बोलू लागल्या. त्या मुली म्हणाल्या हाय, हाय, क्या चाल है! त्या क्षणी कॉलेजच्या मुलींनी भरदिवसा माझी छेड काढल्याने मी गोंधळून गेलो."

4 / 5

बीग बी म्हणाले, " जेव्ही स्वत:वर अशी वेळ येते तेव्हाच माणसाला परिस्थितीची खरी जाणील होते. रस्त्यावरुन जाताना जेव्हा महिलांवर अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या जात असतील, किंवा त्यांच्या छेड काढल्या जात असतील तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाही करवत नाही."

5 / 5

यावर माधुरीने विचारलं की, तुम्ही त्यावेळी काय केले मग? यावर बच्चन म्हणाले की, "काय करणार मी? पळून गेलो मी." त्यांचे उत्तर ऐकून माधुरीही हसली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us