हिवाळ्यात रोज खा आवळ्याचे लाडू; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत मिळतील अनेक फायदे, घरी बनवा झटपट!

आवळा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. आयुर्वेदात आवळ्याला अमृतासमान महत्त्व दिले आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्यात आवळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. रोज कच्चा आवळा खाणे शक्य नसेल, तर तुम्ही त्याचे चविष्ट लाडू बनवू शकता.

| Updated on: Nov 25, 2026 | 9:11 PM
1 / 5
आवळ्याचे लाडू बनवण्यासाठी 500 ग्रॅम ताजे आवळे आणि 350 ते 400 ग्रॅम गूळ घ्या. यासोबत 2 ते 3 चमचे तूप, अर्धा कप नारळाचा किस आणि बदाम, काजू, अक्रोड घ्या. तसेच अर्धा चमचा वेलची पूड आणि 2 चमचे भाजलेले तीळ किंवा जवस पूड घ्या.

2 / 5

सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून 8 ते 10 मिनिटे वाफवून घ्या. थंड झाल्यानंतर त्यातील बिया काढून गर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या

3 / 5

कढईत 1 चमचा तूप गरम करून आवळ्याचा गर 6 ते 8 मिनिटे भाजा. त्यातील ओलावा कमी होईपर्यंत मंद आचेवर परतत राहा.

4 / 5

आता त्यामध्ये बारीक केलेला गूळ घालून सतत ढवळा. मिश्रण घट्ट होऊन कढईपासून सुटू लागल्यावर गॅस बंद करा.

5 / 5

आता उरलेले तूप, नारळाचा किस, सुका मेवा, वेलची पूड आणि तीळ किंवा जवस पूड मिसळा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे लाडू वळा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us