
ईदच्या पार्श्वभुमीवर नागपुरातील जामा मशीद परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः परिसराची पाहणी करत आहेत.

जामा मशीद परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोणातून वॅाच टॅावर, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलंय. पोलीस सुरक्षेच्या दृष्टीनं अगदी दक्ष आहेत.

नागपुरातील जामा मशीद या परिसरात सीसीटीव्हची नजर आहे. नागपूर शहरात 283 तर ग्रामीण भागात 108 मशिदी आहेत. मशिदीसमोर नमाज पढण्यासाठी मोठी गर्दी आहे.

नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्य राखीव दल, होमगार्डसह साडेतीन हजार पोलीस तैनात आहेत. पोलीस अधिकारीही परिसरात दाखल झाले आहेत.

प्रातिनिधिक फोटो