गुलाबी साडीत अमृता खानविलकरचा रॉयल अंदाज! मोत्यांचे दागिने अन् मोहक अदा पाहून चाहते घायाळ
अभिनेत्री अमृता खानविलकरने गुलाबी रंगाच्या सुंदर साडीतले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गुलाबी साडी आणि त्यावरचा आकर्षक ब्लाउज अमृताच्या सौंदर्यात आणखी भर घालताना दिसतोय. अमृताचा हा पारंपरिक आणि रॉयल अंदाज पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गुलाबी साडी, मोत्यांचे दागिने आणि अमृताचं मोहक हास्य… तिचा हा लूक सोशल मीडियावर अक्षरशः लक्ष वेधून घेतोय!

अभिनेत्री अमृता खानविलकरने गुलाबी रंगाच्या सुंदर साडीतले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गुलाबी साडी आणि त्यावरचा आकर्षक ब्लाउज अमृताच्या सौंदर्यात आणखी भर घालताना दिसतोय.
साडीला साजेसे डायमंड खडे आणि मोत्यांचे दागिने परिधान करत अमृताने आपला लूक खुलवला आहे. गळ्यातील सुंदर नेकलेस, झुमके आणि हातातील नाजूक दागिने तिच्या पारंपरिक लूकला परफेक्ट टच देत आहेत.
गुलाबी साडीच्या लूकमध्ये अमृताचा चेहरा अधिकच खुलून दिसत असून तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मोकळ्या बटा, सुंदर एचडी मेकअप आणि कपाळावरची छोटीशी गुलाबीचंद्रकोर तिच्या लूकला खास बनवत आहे.
कॅमेऱ्यासमोर दिलेल्या प्रत्येक पोझमध्ये अमृताचा आत्मविश्वास आणि तिची दिलखेचक अदा पाहायला मिळतेय. कधी गंभीर अंदाजात तर कधी खळखळून हसताना अमृताने चाहत्यांना आपल्या फोटोंच्या प्रेमात पाडलं आहे.
अमृताचा हा पारंपरिक आणि रॉयल अंदाज पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गुलाबी साडी, मोत्यांचे दागिने आणि अमृताचं मोहक हास्य… तिचा हा लूक सोशल मीडियावर अक्षरशः लक्ष वेधून घेतोय!