
ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी आयुष्मान खुराना याच्यासोबत ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

विशेष म्हणजे आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांची जोडी काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ड्रीम गर्ल 2 चे प्रमोशन करताना अनन्या आणि आयुष्मान दिसत आहे.

नुकताच आता अनन्या पांडे हिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये अनन्या पांडे ही चक्क साडीमध्ये दिसत आहे.

अनेकांना अनन्या पांडे हिचा हा लूक आवडल्याचे दिसत आहे. स्काय ब्लू रंगाच्या साडीमध्ये अनन्या पांडे ही दिसली आहे. अनन्या पांडे हिचा हा लूक सर्वांना आवडलाय.

चाहते हे अनन्या पांडे हिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आता अनन्या पांडे हिचा ड्रीम गर्ल 2 चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.