
बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक अनिल कपूर व सुनीता कपूर यांची जोडी आहे. त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात प्रँक कॉलने झाली. अनिलच्या मित्राने सुनीतासोबत चेष्टा करण्यासाठी तिला तिचा नंबर दिला होता. पण सुनीताचा आवाज पहिल्यांदा ऐकल्यावर अनिल कपूर तिच्या प्रेमात पडले.

प्रसिद्ध मॉडेल असल्याने सुनीता अनेकदा परदेशवारी करायच्या.मात्र दोघांनी आपल्या नात्यावर याचा परिणाम होऊ दिला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे जोडपे लग्नाच्या आधी जवळपास 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

अनिल कपूरने 17 मे रोजी 'मेरी जंग' हा पहिला चित्रपट साइन केला आणि दुसऱ्याच दिवशी 18 मे रोजी सुनीताला लग्नासाठी प्रपोज केले.

अनिलकपूरने सुनीताला फोन करून "उद्या लग्न करू - उद्या नाही तर कधीच नाही."लग्न करण्याची मागणी घातली. या लग्नाच्या मागणीला सुनीताने हो म्हटलं परंतु एका अटी की 'ती कधीही स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार नाही'. अनिल कपूरने ही अट मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मे 1984 रोजी जवळपास 10 लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.