48 वर्षांपूर्वीचा सुपरहिट चित्रपट, ज्याचा शेवट पाहताना थिएटरमध्ये रडलेले लोक, कथा ठरलेली हिट

48 वर्षांपूर्वीचा प्रचंड सुपरहिट चित्रपट, ज्याची कथा ठरली हिट. थिएटरमध्ये पाहण्यासाठी व्हायची प्रचंड गर्दी. शेवटचा सीन पाहताना तर अनेक प्रेक्षक रडायचे.

| Updated on: Jun 11, 2026 | 5:18 PM
1 / 5
1978 मध्ये प्रदर्शित झालेला ‘अंखियों के झरोखों से’ हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावनिक आणि संस्मरणीय प्रेमकथांपैकी एक मानला जातो. राजश्री प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाने आपल्या साध्या पण हृदयस्पर्शी कथानकामुळे आणि अविस्मरणीय संगीतामुळे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

2 / 5
हिरेन नाग दिग्दर्शित या चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि रंजीता कौर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. एरिक सीगल यांच्या ‘लव्ह स्टोरी’ या कादंबरीपासून प्रेरित असलेल्या या चित्रपटात श्रीमंत घरातील अरुण आणि मध्यमवर्गीय लिली यांच्या प्रेमकथेचे भावनिक चित्रण करण्यात आले आहे.

3 / 5
चित्रपटातील ‘अंखियों के झरोखों से मैंने देखा जो सांवरे’ हे शीर्षक गीत आजही रसिकांच्या आवडीच्या गाण्यांमध्ये गणले जाते. रवींद्र जैन यांनी दिलेले संगीत आणि चित्रपटातील इतर गाणीही मोठी लोकप्रिय ठरली. या संगीतामुळे चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.

4 / 5
चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याचा भावनिक क्लायमॅक्स. लिलीला रक्ताचा कर्करोग झाल्यानंतर तिच्या आणि अरुणच्या नात्यात येणारे भावनिक वळण प्रेक्षकांना अक्षरशः हेलावून टाकते. विशेषतः शेवटचा प्रसंग अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला होता.

5 / 5
अवघ्या 48 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने सुमारे 1.5 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. उत्कृष्ट कथा, हृदयस्पर्शी अभिनय आणि सदाबहार संगीत यामुळे ‘अंखियों के झरोखों से’ हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटांमध्ये गणला जातो.

Follow Us