सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री; एका एपिसोडसाठी मिळतात तब्बल इतके रुपये

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये भूमिका साकारून अनेक अभिनेत्रींनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकप्रियतेसोबतच या अभिनेत्रींना भरभक्कम मानधनसुद्धा मिळालं. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री कोण आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात..

| Updated on: Mar 16, 2026 | 11:10 AM
1 / 7
बिग बॉसचा पंधरावा सिझन जिंकल्यापासून अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यानंतर ती बऱ्याच मालिका आणि टीव्ही शोजमध्ये झळकली आहे. 'नागिन 6'नंतर ती 'लाफ्टर शेफ'मध्येही दिसली. तेजस्वीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. रिपोर्टनुसार एका एपिसोडसाठी तिला दोन लाख रुपये मानधन मिळतं.

2 / 7
'अनुपमा' या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली गांगुली ही घराघरात लोकप्रिय आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती तीन लाख रुपये फी स्वीकारत असल्याचं कळतंय.

3 / 7
'क्यूंकी सास भी कभी बहू थी 2' या मालिकेत तुलसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मृती इराणी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. सध्याच्या घडीला या मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती तब्बल 14 लाख रुपये फी स्वीकारत आहे. खुद्द स्मृती इराणीनेच याबद्दलची माहिती दिली होती. तिची मालिका टीआरपीच्या यादीतही अग्रस्थानी असते.

4 / 7
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेसुद्धा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये पती विकी जैनसोबत झळकतेय. मिळालेल्या माहितीनुसार एका एपिसोडसाठी तिला अडीच ते तीन लाख रुपये मिळतात.

5 / 7
जेनिफर विंगेट सुद्धा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. तिने आजवर बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. जेनिफर एका एपिसोडसाठी दोन लाख रुपये मानधन घेते.

6 / 7
'कुंडली भाग्य' या लोकप्रिय मालिकेत प्रीताची भूमिका साकारलेली अभिनेत्री श्रद्धा आर्यसुद्धा प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतीच ती आई बनली आणि त्यानंतर तिने मालिकेत काम करणं थांबवलं आहे. परंतु तिची लोकप्रियता अजूनही तेवढीच आहे. 'कुंडली भाग्य'च्या एका एपिसोडसाठी ती एक लाख रुपये फी घ्यायची असं कळतंय.

7 / 7
जन्नत झुबैर ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणारी कमी वयातली अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाइल्ड आर्टिस्ट म्हणूनही तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलंय. अवघ्यात 23 व्या वर्षी ती लाफ्टर शेफमधून तगडी कमाई करतेय. एका एपिसोडसाठी तिला दोन लाख रुपये मिळत आहेत.

Follow Us