AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोक्यावर 48000 रुपयांचा हप्ता, तरी सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; अंशुमन विचारेनं सांगितलं खरं कारण

अंशुमन विचारेनं जेव्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडली, तेव्हा प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. त्याने लॉकडाऊनच्या काळात हा निर्णय घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंशुमनने त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

| Updated on: Jun 09, 2026 | 12:32 PM
Share
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय. या कार्यक्रमातून अनेक कलाकार लोकप्रिय झाले. त्यापैकीच एक आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता अंशुमन विचारे होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडला होता. त्यावेळी चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता त्याने त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

1 / 5
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंशुमन म्हणाला, "कोरोना महामारी आणि लॉकडाऊनपूर्वी माझं करिअर जोरात सुरू होतं, चांगली कमाई होत गेली. त्याच जोरावर मी पुण्यात एक नवीन घर खरेदी केलं होतं. पण त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर झाला. त्यावेळी हास्यजत्रेच्या टीमने बायो बबलमध्ये शूटिंगचा निर्णय घेतला होता."

2 / 5
"माझी मुलगी त्यावेळी फक्त दीड वर्षांची होती. तिला आणि माझ्या कुटुंबाला सोडून मी अनेक दिवस बायोबबलमध्ये शूटिंग करण्यास तयार नव्हतो. याशिवाय कामातही तोच-तोचपणा आला होता. कलाकार म्हणून माझी एक्स्पायरी डेट जवळ आली की काय, अशी भीती वाटू लागली होती. त्यामुळे मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता", असं अंशुमनने स्पष्ट केलं.

3 / 5
ब्रेक घेण्याच्या निर्णयाबद्दल अंशुमन भावूक होत पुढे म्हणाला, "डोक्यावर नवीन घराचा 48 हजार रुपयांचा हप्ता आहे. पुढे काय करायचं, कसं करायचं, असं जेव्हा बायकोला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, तुला जर तिथे काम करायचं नसेल, तर ठीक आहे. आपण घराचे हप्ते मॅनेज करू. अगदीच बेताची परिस्थिती झाली तर आमटी-भात, खिचडी खाऊन दिवस काढू. पण तू हार मानू नकोस. तिच्या पाठिंब्यामुळेच मी तो काळ मुलीसोबत घालवू शकलो."

4 / 5
अंशुमनने फार विचार करून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. चौकटीतून बाहेर पडल्यानंतर खरा विकास होतो, हे त्याने सिद्ध केलं. आता तो 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात