Apple Welcome Home Event : Apple चा 13 ऑक्टोबरला मोठा इव्हेंट! Smart Home Hub पासून MacBook Pro पर्यंत नवीन डिव्हाइसची चर्चा
Apple १३ ऑक्टोबरला न्यूयॉर्कमध्ये ‘Welcome Home’ हा खास कार्यक्रम आयोजित करणार आहे. यामध्ये Smart Home Hub, नवीन HomePod mini आणि Apple TV 4K सादर होण्याची शक्यता आहे.

Apple ने 13 ऑक्टोबर 2026 ला न्यूयॉर्कमध्ये 'Wecome Home नावाचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यामध्ये रोजच्या कामात लागणार्या वस्तूंचे प्रदर्शन (smart Hub ) भरणार आहे.पण याच वस्तूंना Apple स्मार्ट आणि आपल्याला Ai चा टच देणार आहे. लवकरच त्या वस्तू भारतात देखील उपलब्ध होणार आहेत.
Apple एका नवीन Smart Home Hub वर काम करत आहे.या उपकरणाला असणाऱ्या स्क्रिनच्या मदतीन घरातील स्मार्ट लाईट्स, गाणी आणि इतर कनेक्शन असलेली डिव्हाईस बसल्या बसल्या एका क्लिकवर बंद करणे शक्य होणार आहे.
Apple च्या HomePod mini या स्मार्ट स्पीकरचे नवीन मॉडेल अॅपल सादर करणार आहे. यात वेगवान प्रोसेसर, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि अनेक पर्याय मिळणार आहेत.
Apple त्याच्या आगामी MacBook pro मध्ये टचस्क्रिन आणि OLED डिस्प्ले मिळू शकतो. त्यामुळे यूजर्सना स्क्रिनला टच करून लॅपटॉप वापरता येणार आहे.
Apple च्या M6 चीपवर आधारित नवीन MacBook Pro आणि imac सादर केले जाण्याची शक्यता आहे. नवीन चिपमुळे कॉम्युटरच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते.
Apple च्या आगामी iPad mini मध्ये OLED डिस्प्ले मिळू शकतो. OLED स्क्रिनमुळे रंग अधिक चांगला दिसून चित्रांचा कॉन्स्ट्रास्ट सुधारणार आहे.