AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

47 वर्षांपूर्वीचं मिथुनचं सुप्रसिद्ध गाणं आता इमरान हाशमी गाजवणार, बप्पी लहिरींच्या गाण्याला नवा तडका, नेमकं कोणतं?

Gunmaster g9 title track : जुन्या गाजलेल्या गाण्यांना नव्या अंदाजात सादर करण्याचा ट्रेंड पुन्हा चर्चेत आला आहे. इमरान हाशमीच्या 'गनमास्टर जी9' सिनेमाच्या टायटल ट्रॅकमध्ये 1979 मधील 'सुरक्षा' सिनेमातील गाणं पाहायला मिळत आहे.

47 वर्षांपूर्वीचं मिथुनचं सुप्रसिद्ध गाणं आता इमरान हाशमी गाजवणार, बप्पी लहिरींच्या गाण्याला नवा तडका, नेमकं कोणतं?
Gunmaster g9 title trackImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 21, 2026 | 6:04 PM
Share

जुन्या गाजलेल्या गाण्यांना नव्या अंदाजात सादर करण्याचा ट्रेंड पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. नुकत्याच चर्चेत आलेल्या ‘धुरंधर’ सिनेमानंतर आता अभिनेता इमरान हाशमीच्या आगामी ‘गनमास्टर जी9’ या सिनेमाचीही यात भर पडली आहे. धुरंधरमध्ये रंभा हो हे गाणं पुन्हा ऐकायला मिळालं होतं. त्याशिवाय हवा हवा हे पाकिस्तानी गायकाचं गाणंही ऐकायला मिळालेलं. आता गनमास्टर जी9 या सिनेमाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला असून, त्यातीलही जुन्या गाण्याचं कनेक्शन विशेष लक्ष वेधून घेत आहे. तब्बल 47 वर्षांपूर्वी गाजलेलं मिथुन चक्रवर्ती आणि बप्पी लाहिरी यांचं एक लोकप्रिय गाणं नव्या रूपात पुन्हा प्रेक्षकांसमोर आलं आहे.

मिथुन चक्रवर्तींच्या गाण्याला नवा साज

इमरान हाशमीने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ‘गनमास्टर जी9’चा टायटल ट्रॅक शेअर केला आहे. हे गाणं समोर येताच जुन्या गाण्यांच्या चाहत्यांना 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुरक्षा’ सिनेमाची आठवण झाली. या सिनेमातील ‘मौसम है गाने का’ हे गाणं नव्या अंदाजात सादर करण्यात आलं आहे.

या मूळ गाण्याला बप्पी लाहिरी यांनी आपला आवाज आणि संगीत दिलं होतं. मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं त्या काळात लोकप्रिय ठरलं होतं. आता तब्बल 47 वर्षांनंतर हेच गाणं नव्या संगीतासह पुन्हा सादर करण्यात आलं आहे. संगीतकार विक्रम मॉन्ट्रोज यांनी या नव्या व्हर्जनला संगीत दिलं आहे. त्यामुळे जुन्या गाण्याची आठवण आणि नव्या संगीताचा अंदाज असा संगम यात पाहायला मिळतो.

कधी प्रदर्शित होणार ‘गनमास्टर जी9’?

इमरान हाशमीच्या या सिनेमात अभिनेत्री जेनेलिया डिसूझाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील काही गाणी याआधीच रिलीज झाली असून, आता टायटल ट्रॅकमुळे सिनेमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

‘गनमास्टर जी9’ हा सिनेमा 27 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती आणि बप्पी लाहिरी यांच्या गाजलेल्या गाण्याचं नवं व्हर्जन प्रेक्षकांना किती आवडतं, याकडे लक्ष लागलं आहे.

Follow Us
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना