
कोल्हापूरचे धनंजय महाडिक भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यसभेसाठी अर्ज भरला. या शुभकार्यासाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी श्री सिद्धिविनायकाचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कायम तत्पर राहण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धिविनायकाच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या साथीने ती संधी पुन्हा लाभेल, असा विश्वास आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

भाजपचे नेते, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनिल बोंडेकडे राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या काळात काही काळ राज्याचे कृषीमंत्री पद होते. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारा अशी त्यांची ओळख आहे. 2022 च्या अमरावतीच्या दंगलीत त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिकाही त्यांच्या साठी जमेची ठरली आहे.

भाजपचे नेते पियुष गोयल यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला. शिवसेनेने केलेल्या विश्वास घातच प्रतिउत्तर देणार असे म्हणत पियुष गोयल असे म्हणत अर्ज दाखल करण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला.

याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार , काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले आदी लोक उपस्थित होते.

काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना रविवारी राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. इम्रान हे कवाली गायक व प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समज जातात. त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

शिवसेनेकडून माजी खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

याबरोबरच शिवसेनेने छत्रपती संभाजी यांना तिकीट नराकारात. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे