मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ प्रकल्पाला मंजुरी, साडे तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे आदेश 

मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या साडे तीन वर्षांत या मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

| Updated on: Oct 27, 2026 | 7:46 PM
1 / 5
 मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ या १८.४० किमीच्या मार्गावर एकात्मिक उड्डाणपुलासह १२ उन्नत स्थानक आहेत. या प्रकल्पाला १३ हजार ८५६ कोटी रुपये प्रकल्प खर्च अपेक्षित आहे.

मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ या १८.४० किमीच्या मार्गावर एकात्मिक उड्डाणपुलासह १२ उन्नत स्थानक आहेत. या प्रकल्पाला १३ हजार ८५६ कोटी रुपये प्रकल्प खर्च अपेक्षित आहे.

2 / 5

मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) या भागाला जोडणाऱ्या १८.४० किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्गिकेला १२ -(अ) ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली.

3 / 5

मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका पुढील साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयातील मंत्रिमंडळ कक्षात झाली. या बैठकीचे अध्यक्ष स्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूषवले होते.

4 / 5

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.

5 / 5

ठाण्यातील गायमुख ते कासावडवली या मेट्रो - ४ अ मार्गिकेची सुरुवात यंदाच्या दिवाळी होणार असल्याची माहिती कालच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us