अरबाज खानने केली चक्क सलमान खान याची मोठी पोलखोल, म्हणाला, सेटवर कायमच…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सलमान खानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. एका मागून एक चित्रपट त्याचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

सलमान खानचा दबंग हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाने अत्यंत मोठा धमाका केला. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानच्याच भावाने अरबाज खान याने केली.

सलमान खान याचे चित्रपटाच्या सेटवर खूप जास्त नखरे असतात, याचा खुलासा स्वत: अरबाज खान याने केलाय. अरबाज खान म्हणाला की, या चित्रपटासाठी सलमान खानचा मिशीचा लूक होता.

सलमान खान याने स्पष्टपणे मिशी लावण्यास नकार दिला. त्याने नकार दिला तरीही आम्ही तीन ते चार मिशी मागून ठेवल्या होत्या. त्याला वाटले की, आता मिशी लावण्याची गरज नाही.

शूटच्या वेळी त्याला त्या मिशी देण्यात आल्या आणि त्याला लावावी देखील लागली. चुलबुल पांडेच्या पात्रामध्ये त्याने मिशी लावलेली आहे.