
बिग बॉस मराठीचे 5 वे सीजन धमाका करताना दिसत आहे. अनेक वाद आणि भांडणे सध्या बिग बॉसच्या घरात बघायला मिळत आहेत.

आता चक्क अरबाज पटेल आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये जोरदार वाद होताना दिसणार आहे. हेच नाही तर वाद टोकाला गेल्याचे बघायला मिळतंय.

बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या लव्ह अॅंगल बघायला मिळत होता. दोघांची जवळीकता वाढत होती.

आता नुकताच दिलेल्या टास्कनंतर अरबाज पटेल आणि निकी तांबोळी यांच्यात वाद झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर घरातील साहित्य फेकून देताना रागात अरबाज दिसतोय.

निकी तांबोळी आणि अरबाज पटेल दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. पुढील एपिसोडमध्ये धमाका होणार हे नक्की आहे.