
'कुछ कुछ होता है'मध्ये 'मिस ब्रिगेंजा'ची भूमिका साकारलेली अभिनेत्री अर्चना पुरण सिंह तिच्या हास्यामुळे आज लोकप्रिय आहे. कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या विनोदबुद्धीने लोकांना हसवतो आणि या शोमध्ये अर्चनासुद्धा कपिलच्या विनोदांवर खळखळून हसताना दिसते. मात्र यासाठी तिला किती मानधन मिळतं हे तुम्हाला माहित आहे का?

अर्चना पुरण सिंह या आलिशान आयुष्य जगतात. रिपोर्ट्सनुसार, अर्चना एका एपिसोडसाठी 10 लाख रुपये मानधन घेते. कपिल शर्मा शोच्या तिसऱ्या सिझनसाठी तिने 8 कोटी रुपये घेतले होते. तर अर्चनाची एकूण संपत्ती 31 दशलक्ष डॉलर्स असल्याचं कळतंय.

अर्चनाने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. 'जलवा', 'अग्निपथ', 'सौदागर', 'राजा हिंदुस्तानी' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 'कॉमेडी सर्कस', 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' यांसारख्या कॉमेडी शोजमध्ये ती परीक्षक म्हणून उपस्थित होती.

'द कपिल शर्मा शो'मध्ये अनेकदा कपिल आणि अर्चना यांच्यात मजामस्ती पहायला मिळते. कपिल अनेकदा त्याच्या विनोदांतून अर्चनाची मस्करी करतो. त्यावर प्रेक्षकसुद्धा खळखळून हसतात. आता हा शो एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल शर्माने अर्चनाचा उल्लेख 'लकी चार्म' असा केला आहे. आपल्या शोसाठी त्या नेहमीच 'लकी चार्म' ठरत असल्याचं त्याने म्हटलंय. 2013 मध्ये कपिलने हा शो सुरू केला. त्याआधी कॉमेडी सर्कसमध्ये दोघांनी काम केलं होतं.