कोण आहे अर्जुन कपूरचा भावोजी? रोहन ठक्करची इतकी संपत्ती, अंशुलापेक्षा वयाने लहान

प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर आणि त्यांची दिवंगत पहिली पूर्व पत्नी मोना शौरी यांची मुलगी अंशुला कपूरचं नुकतंच थाटामाटात लग्न झालं. अंशुलाने बॉयफ्रेंड रोहन ठक्करशी लग्नगाठ बांधली आहे. अर्जुन कपूरचा भावोजी रोहन काय करतो, अंशुला आणि त्याच्या वयात किती अंतर आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: Jul 07, 2026 | 1:11 PM
1 / 5
अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने पटकथालेखक रोहन ठक्करशी लग्न केलं आहे. मुंबईतील ताज लँड्स अँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. पटकथालेखनाच्या विश्वात आपली वेगळ ओळख निर्माण केलेल्या रोहनचं कनेक्शन करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनशीही आहे.

2 / 5
रोहन ठक्कर हा पटकथालेखक असून तो करण जोहरच्या 'धर्माटिक एंटरटेन्मेंट' कंपनीत फ्रिलान्स लेखक म्हणून काम करतोय. या कंपनीने मोठमोठ्या स्ट्रीमिंग आणि डिजिटल प्रोजेक्ट्ससोबत काम केलं आहे. मनोरंजन श्रेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी रोहन जाहिराती आणि डिजिटल मीडियामध्ये काम करत होता.

3 / 5
रोहन ठक्कर हा वयाने अंशुलापेक्षा जवळपास अकरा महिन्यांनी लहान आहे. अंशुला 33 वर्षांची असून रोहन 32 वर्षांचा आहे. त्याने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून नाट्यलेखन आणि पटकथालेखनात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्याने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस इथंही शिक्षण घेतलं आहे.

4 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहन ठक्करची एकूण संपत्ती 10 लाख डॉलर्सपेक्षा जास्त (सुमारे 8.5 कोटी रुपये) आहे. तर अंशुला कपूरनेही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती फॅनकाईंट नावाचं एक व्यासपीठ चालवते. तिच्याकडे जवळपास 12 ते 14 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

5 / 5
अंशुला कपूरने 2023 मध्ये पहिल्यांदा सोशल मीडियावर रोहन ठक्करसोबतचं नातं जगजाहीर केलं होतं. अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या अंशुलाच्या सावत्र बहिणी आहेत. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन-अंशुला आणि जान्हवी-खुशी यांच्यातील कटुता मिटली.

Follow Us