मुलगा क्रिकेटर तर सून…, सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुनची होणारी पत्नी सानिया नक्की काय करते?

अर्जुन तेंडुलकर याने मुंबईतील उद्योजक रवी घई यांच्या नाती सानिया चांडोकसोबत साखरपुडा केला आहे. ती सारा तेंडुलकरची जवळची मित्र आहे आणि अर्जुनच्या लंडनमधील क्रिकेट प्रशिक्षणाच्या काळापासून हे नाते आहे.

| Updated on: Aug 14, 2025 | 12:42 PM
1 / 10
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा पार पडला. क्रिकेटच्या जगात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत असलेल्या अर्जुनने त्याच्या बालपणीची मैत्रिण सानिया चंडोकसोबत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

2 / 10
अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा काल 13 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत एका खाजगी ठिकाणी पार पडला. याबद्दल दोन्ही कुटुंबांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली, तरी यामुळे तेंडुलकर कुटुंबिय चर्चेत आले आहे.

3 / 10
अर्जुन 25 वर्षांचा असून त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लवकर विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकर यांचा विवाह 24 मे 1994 रोजी वयाच्या 22 व्या वर्षी अंजली मेहता यांच्याशी झाला होता.

4 / 10
आता अर्जुनची पत्नी आणि सचिनची सून सानिया चंडोक नक्की कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच ती नक्की काय करते, याबद्दलचीही चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आज आपण सानिया चंडोकबद्दल जाणून घेणार आहोत.

5 / 10
सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंबीय हॉटेल आणि खाद्य उद्योगात प्रसिद्ध आहेत. त्यांचे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी हे प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लर आहे.

6 / 10
सानियाने मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूलमधून शिक्षण घेतले होते. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. त्यानंतर 2020 मध्ये ती भारतात परतली.

7 / 10
सानिया ही प्राणीप्रेमी असून तिच्याकडे तीन पाळीव श्वान आहेत. भारतात परतल्यानंतर तिने प्राणीप्रेमातून स्वत:चा बिझनेस सुरु केला. तिने मिस्टर पॉज प्रीमियम पेट सलूनची सुरुवात केली आहे.

8 / 10
सानियाने पशुवैद्यकीय तंत्रज्ञ ही पदवी घेतली आहे. तिने प्राण्यांसाठी सुरु केलेले मिस्टर पॉज हे सलून वरळीतील उच्चभ्रू सोसायटीत आहे. तिच्या या सलूनला सेलिब्रेटी आणि अनेक उच्चभ्रू लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

9 / 10
तिने इन्स्टाग्रामवर मिस्टर पॉज या नावाने एक पेजही सुरु केले आहे. त्यात ती कायमच विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. तिच्या या पेजचे साधारण ३७५० फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे तिच्या या पेजला सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर यांसह अनेकजण फॉलो करतात.

10 / 10
अर्जुनची होणारी पत्नी सानिया ही सारा तेंडुलकरची खास मैत्रीण आहे. त्या दोघीही अनेकदा एकत्र फिरत असतात. सारा आणि सानिया दोघींनीही लंडनमधून पदवी घेतली आहे, तर अर्जुननेही त्याच काळात लंडनमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे या तिघांचेही चांगले संबंध आहेत.