
बॉलीवूड कलाकार अर्जून कपूर वअभिनेत्री मलायका अरोरा या अफेअरची बरीच चर्चा आहे. दोन्ही स्टार्स सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. आता नुकतेच अर्जुन कपूरने मलायकासोबतच्या नात्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

अर्जुन म्हणाला की हे एका व्यक्तीच्याबाबत आहे जी कायम तुमच्या आजूबाजूला असते तेव्हा तुम्ही आनंदी असता. जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात असता तेव्हा ते इक्वेशन तुम्हाला तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल बोलण्याची मत व्यक्त करण्याची परवनगी देते.

अर्जुनने सांगितले की, तो मलायकाला फिटनेसच्या बाबतीत मी माझी प्रेरणा मानतो. मलायकाने मला नेहमीच यासाठी प्रोत्साहित केले आहे. ती अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे आणि मला तिच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळाली आहे.

मलायकाबद्दल अर्जुन कपूर म्हणतो की, ती मला नेहमीच सपोर्ट करत आली आहे. माझ्यातील उणिवा आणि भावना तिने नेहमीच समजून घेतल्या आहेत. तिच्यासोबत असण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिला या चित्रपटसृष्टीची चांगली जाण आहे. ती स्वतःही या क्षेत्रात कार्यरत आहे.

नुकताच अभिनेता अर्जुन कपूरचा एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, हा मल्टीस्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ चालला नाही. या चित्रपटात त्याच्याशिवाय तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानी हे कलाकार ही होते.