
अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात पोहोचला होता. यावेळी सुरूवातीला अरमान मलिक याच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली.

विशेष म्हणजे अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही टॉप 5 पर्यंत पोहोचली. अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे.

आता नुकताच पायल मलिक हिची तब्येत खराब झाल्याचे बघायला मिळतंय. पायल मलिक हिला थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

कृतिका ही पायलला रूग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. पायल मलिक हिचे रिपोर्ट ठिक नसल्याचेही सांगितले जातंय. रात्रभर पायलला रूग्णालयात ठेवण्यात आले.

पायल मलिक हिचे ब्लड प्रेशर वाढले असून तिला श्वास घेण्यासही त्रास होतोय. पायल हिचे हाल पाहून चाहते हे चांगलेच चिंतेत आल्याचे बघायला मिळतंय.