Wimbledon 2026 : अभिमानाची गोष्ट, 36 वर्षानंतर विंबलडन पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा भारतीय खेळाडू कोण?
Wimbledon 2026 : पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा 36 वर्षातील पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी महान टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांनी 1990 साली हे यश मिळवलेलं.

टेनिसच्या कोर्टवरुन मागच्या काही वर्षात भारतासाठी चांगली बातमी आलेली नाही. भारताचा उदयोन्मुख टेनिस खेळाडू अर्णव पापरकरने टेनिस चाहत्यांना खुश होण्याची एक संधी दिली आहे. तो विंबलडन 2026 मध्ये पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (Photo: Getty IMages)

18 वर्षाचा अर्णव विंबलडन जूनियरच्या पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा 36 वर्षातील पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. अर्णवच्या आधी महान टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांनी 1990 साली हे यश मिळवलेलं. (Photo: Getty IMages)

अर्णवने टुर्नामेंटमध्ये अजूनपर्यंत तरी एकही सेट गमावलेला नाही. दमदार खेळ दाखवत त्याने अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या प्री-क्वार्टर फायनल मॅचमध्ये त्याने जपानच्या रियो तबाताला फक्त 52 मिनिटात सरळ सेटमध्ये 6-2, 6-1 ने हरवलं. (Photo: Getty IMages)

इतकचं नाही, टुर्नामेंटच्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने जूनियर वर्ल्ड नंबर 3 आणि ऑस्ट्रेलियन ओपन जूनियरचा फायनलिस्ट अमेरिकेच्या कीटन हँसचा 6-2, 6-3 ने पराभव करुन मोठा उलटफेर केला. आता तो क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. तिथे तो अमेरिकेच्या जॉर्डन ली ला भिडणार आहे. (Photo: Getty IMages)

6 फूट 1 इंच उंचीचा अर्णव आपल्या शानदार सर्विससाठी ओळखला जातो. अनेकदा तो 'एस'द्वारे पॉइंट मिळवतो. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने टेनिस खेळायला सुरुवात केली. अर्णवने यावर्षी फ्रेंच ओपन ज्यूनियरच्या तिसर्या फेरीपर्यंत प्रवेश केला होता.(Photo: Getty IMages)