
राजस्थानी माठ आकर्षणाचे केंद्रबिंदू : नंदूरबार बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे माठ दाखल झाले आहेत. असे असताना मात्र, सिरॅमिक माती आणि राजस्थानी माठ हेच ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. रंगीबेरंगी माठाबरोबरच मातीचे माठ खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

दवाढ होऊनही मार्केट कायम : माठाच्या किंमतीमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असतानाही माठ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. माठातील पाण्याला एक वेगळी चव असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

ग्राहकांची गर्दी कायम : वाढत्या दरामुळे माठाच्या खरेदीवर परिणाम झालेला नाही हे विशेष. दिवसेंदिवस ऊनामध्ये वाढ झाली की ग्राहकांचे पाय माठ खरेदीकडे वळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

किंमतीमध्ये 25 टक्के वाढ: वाढत्या महागाईचा परिणाम माठाच्या किंमतीवरही झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 25 टक्के वाढ झाली असून बाजारात माठ हे 70 रुपयांपासून ते 500 रुपयांर्यंत मिळत आहेत.

बाजारात रंगीबेरंगी माठ : गेल्या दोन वर्षापासून बाजारपेठेत माठ दाखल होत नव्हते. कोरोनाचा परिणाम या व्यवसयावरही झाला होता. यंदा मात्र, वेगवेगळे आणि रंगीबेरंगी माठ दाखल झाले असून ग्राहकही खरेदीमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे.