आशा भोसलेंचं ते ‘बोल्ड’ गाणं! झीनत अमान गाण्यात आऊट ऑफ कंट्रोल, शेवटी सरकारनेही घातली बंदी!
आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याच्या शुटिंगच्या वेळी जीनत अमान आऊट ऑफ कंट्रोल झाल्या होत्या. जीनत अमानला नीट चालताही येत नव्हतं, असं अभिनेत्रीनेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. सरकारने या गाण्यावर बंदी घातली होती.

गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले. त्या कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तसेच व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत होत्या. त्यांनी हजारो गाणी रेकॉर्ड केली आहेत. पण 70-80च्या दशकातील एका गाण्याने खळबळ माजली होती.

झीनत अमान ही ७० आणि ८० च्या दशकातील अत्यंत लोकप्रिय आणि बोल्ड अभिनेत्री. आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं तिच्या करिअरला रातोरात वेगळी ओळख देऊन गेलं. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या जोडीने बनलेलं हे गाणं इतकं वेगळं आणि बोल्ड होतं की, त्याने संपूर्ण देश हादरला.

१९७१ साली रिलीज झालेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे गाणं आजही पार्टी प्लेलिस्ट, रेट्रो आणि रिमिक्समध्ये तितकंच लोकप्रिय आहे. Gen Z पिढीही आज ‘दम मारो दम’ ऐकायला आणि नाचायला आवडते.

गाण्यात झीनत अमान चिलम-गांजा ओढत, हिप्पी स्टाइलमध्ये डान्स करताना दाखवली होती. त्या काळात हिप्पी कल्चर आणि बंडखोरी दाखवणारं हे गाणं इतकं बोल्ड मानलं गेलं की, त्यावर प्रचंड टीका झाली. आशा भोसले यांच्यावरही जोरदार टीका झाली होती. वाद इतका वाढला की, शेवटी सरकारने या गाण्यावर बंदी घातली.

दूरदर्शनने तर हे गाणं दाखवण्यास नकार दिलाच, पण ऑल इंडिया रेडिओनेही ते वाजवण्यास नकार दिला होता. मात्र, प्रसिद्ध रेडिओ स्टेशन ‘सीलो’वर हे गाणं मोठ्या प्रमाणात वाजलं आणि सलग पाच महिने रेडिओ चार्टवर नंबर एक राहिलं.

या वादग्रस्त गाण्यासाठी आशा भोसले यांना ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. चित्रीकरणादरम्यान झीनत अमानने इतका हुक्का ओढला होता की, तिला नीट चालताही येत नव्हतं, अशी कबुली स्वतः अभिनेत्रीने एका मुलाखतीत दिली होती. आजही हे गाणं आपल्या बोल्ड म्युझिक, धमाकेदार बीट आणि आशा भोसलेंच्या जबरदस्त गायकीमुळे पार्टी, लग्न आणि रेट्रो प्लेलिस्टचा अविभाज्य भाग आहे.