AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रभू रामाने सीतेचा त्याग केला, मी राम मंदिरात कसा जाऊ?, माजी क्रिकेटपटू, खासदार कीर्ती आझाद यांचा सवाल

माजी क्रिकेटपटू आणि टीएमसी खासदार कीर्ती आझाद यांनी राम मंदिराला भेट देण्यास नकार दिला आहे. प्रभू रामचंद्रांनी सीतेची अग्निपरीक्षा घेतली, तरीही तिचा त्याग केला, त्यामुळे अशा मंदिरात मी कसा जाऊ, असा सवाल आझाद यांनी उपस्थित केला आहे. ते स्वतःला सीतेचे भक्त मानतात आणि मिथिलाच्या संबंधामुळे सीतेसाठी आवाज उठवण्याचे आवाहन करतात.

प्रभू रामाने सीतेचा त्याग केला, मी राम मंदिरात कसा जाऊ?, माजी क्रिकेटपटू, खासदार कीर्ती आझाद यांचा सवाल
Kirti AzadImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2026 | 11:31 AM
Share

एकीकडे देशभरात ‘रामायण’ या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने कोटीच्या कोटीची उडुाणे घेतली आहे. या सिनेमाचं कौतुक होत असतानाच टीएमसीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी एक विधान केलं आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अयोध्येतील राम मंदिरात जाण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर कीर्ती आझाद यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे त्याचे राजकीय वर्तुळातून पडसाद उमटत आहेत.

कीर्ती आझाद यांनी माता सीतेचा उल्लेख करून हे विधान केलंय. मी आयोध्येतील राम मंदिरात जाणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याचं कारणही आझाद यांनी दिलं आहे. भगवान प्रभू रामाने सीतेची अग्निपरीक्षा घेतली. ती त्यांनी पार पाडली. तरीही त्यांचा प्रभू रामाने त्याग केला, असं कीर्ती आझाद म्हणाले.

देशात 3,200 कोटी देवी देवता आहेत. त्यात रामच फक्त देव आहेत का? मी अयोध्येच्या राम मंदिरात कधीच जाणार नाही. कारण भगवान रामाने आपल्या पत्नीचा त्याग केला होता. सीतेने अग्नि परीक्षा पास केली होती. तरीही त्यांनी माँ सीतेला आपल्या घरातून बाहेर काढलं होतं. तिथे मी का जाऊ? असा सवाल आझाद यांनी केला आहे.

सीतेसाठी लढणार

आपला मिथिलेशी संबंध असल्याचं सांगतानाच, माता सीता मिथिलाची कन्या होती. तिथल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सीता मैय्या आईसारखी आहे. मी स्वत: सीतेच्या जन्मभूमीतून आलेलो आहे. सीता माझी आई आहे. आमच्या प्रत्येक व्यक्तीची ती आई आहे, असं ते म्हणाले.

प्रभू रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. त्यावरही त्यांनी सवाल केले. अग्नि परीक्षा पास केल्यानंतरही माता सीता आणि तिच्या दोन लहानग्यांना घरातून हाकलून देण्यात आलं. तरीही मर्यादा पुरुषोत्तम? ही कोणती मर्यादा आहे? मी मुलांना काय सांगणार? असा सवाल त्यांनी केला.

काली आणि कामाख्या मंदिराचा उल्लेख

यावेळी त्यांनी आपण धार्मिक असल्याचं स्पष्ट केलं. मी नेहमी कामाख्याला जातो. माँ कालीची पूजा करतो. माझे वडील दुर्गा भक्त होते. मी स्वत: माँ कालीचा भक्त आहे. काली कामाख्या, दक्षिण काली, कालीघाट आणि दिल्लीच्या गोल मार्केटमदील काली मंदिरात मी पूजा केलेली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

या मंदिरात गेल्याने, माँ कालीची पूजा केल्याने मी हिंदू ठरत नाही का?, असा सवाल करतानाच सीता मैय्या मिथिलेची कन्या होती. त्यामुळे सीता मैय्यासाठी आवाज उठवला पाहिजे, असं ते म्हणाले. मी राम मंदिरात जाणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Follow Us
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा भन्नाट संवाद व्हायरल!
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड