परेश रावल यांच्या कानाखाली मारावसं… मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला शुटिंग दरम्यानचा किस्सा

अभिनेत्री आशा ज्ञाते यांचं अम्मा हे पात्र "सुख म्हणजे नक्की काय असतं" या मालिकेतून घराघरात पोहोचलं. सध्या त्या 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातील किस्स्यामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांना परेश रावल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर आणि अनोखा अनुभव सांगितला.

| Updated on: Nov 18, 2026 | 3:02 PM
1 / 5
आशा ज्ञाते यांनी अलीकडेच एख मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी 'वेलकम टू द जंगल' चित्रपटातील कामाचा अनुभव सांगितला. मोठ्या प्रॉडक्शनमध्ये काम करण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता.

आशा ज्ञाते यांनी अलीकडेच एख मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी 'वेलकम टू द जंगल' चित्रपटातील कामाचा अनुभव सांगितला. मोठ्या प्रॉडक्शनमध्ये काम करण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता.

2 / 5

आशा यांनी सांगितले की, त्यांना घरून ऑडिशन करून पाठवण्यास सांगण्यात आले होते. मात्र, घरी कोणी नसल्यामुळे त्यांना स्वतः ऑडिशन रेकॉर्ड करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ही अडचण सांगितली.

3 / 5

परेश रावल यांच्यासोबत एका सीनमध्ये काम करताना त्यांना वेगळाच अनुभव आला. या सीनमध्ये त्यांच्या कानाखाली मारण्याचा प्रसंग होता. हे ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांना मारावसं वाटेना... एक आदर असल्यामुळे त्यांना जमत नव्हतं.

4 / 5

आशा यांनी सांगितले की, सकाळी 8 वाजता बोलावले आणि संध्याकाळी 4 वाजता सीन लावला. परेश रावल यांचे डायलॉग ऐकून राग येतो आणि त्यांच्या कानाखाली मारायची असते, असे त्यांना समजावण्यात आले.

5 / 5

यावर परेश रावल यांनी त्यांना 'बिनधास्त मारा' असे सांगितले. मात्र, आशा म्हणाल्या, "मी म्हणाले की नाही सर." पुढे त्यांनी सांगितले की, कलाकार म्हणून भूमिका करताना मनात त्या व्यक्तीबद्दल एक आदर असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us