AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonakshi Sinha: राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर सोनाक्षी सिन्हाचा टोला; म्हणाली ‘माझी होणारी मुलं..’

Sonakshi Sinha: राहुल गांधी यांनी नुकतंच त्यांच्या आईवडिलांविषयी असं एक वक्तव्य केलं, ज्यामुळे संपूर्ण देशात त्याची चर्चा सुरू आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

Sonakshi Sinha: राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर सोनाक्षी सिन्हाचा टोला; म्हणाली 'माझी होणारी मुलं..'
सोनाक्षी सिन्हा, राहुल गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 18, 2026 | 3:02 PM
Share

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि मिश्किल स्वभावासाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा तिची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. यावेळी निमित्त ठरलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या नात्याबद्दल सांगितलेला एक किस्सा. राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी आणि वडील, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रेमळ नात्याची आठवण सांगितली होती. यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. याच चर्चेत सोनाक्षी सिन्हानेही उडी घेत मिश्किल अंदाजात प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या होणाऱ्या मुलांना कल्पनाही नाही की त्यांच्यासाठी पुढे काय वाढून ठेवलं आहे. तयार राहा मुलांनो’, अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

16 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली इथं सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या बालपणीचा एक खास किस्सा सांगितला. ते म्हणाले की, त्यांच्या घरी जेवणाच्या वेळी वडील राजीव गांधी असायचे आणि त्यांच्या मांडीवर आई सोनिया गांधी बसलेल्या असायच्या. हे दृश्य त्यांच्यासाठी अगदी सामान्य होतं. लहानपणी त्यांना वाटायचं की प्रत्येकाच्या घरी असंच असतं. मात्र, जेव्हा ते मित्रांच्या घरी जायचे, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांना अशा प्रकारे एकमेकांच्या जवळ बसलेलं पाहायला मिळत नसे. त्यामुळे राहुल गांधी मित्रांनाच विचारायचे की, तुमची आई तुमच्या वडिलांच्या मांडीवर का बसत नाही?

सोनाक्षीने शेअर केली मजेशीर पोस्ट

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या आठवणीचं कौतुक केलं, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी पती-पत्नीने अशा प्रकारे प्रेम व्यक्त करण्यावर प्रश्न उपस्थित केले. याचदरम्यान सोनाक्षी सिन्हाने ‘Woemaniyah’ या सोशल मीडिया पेजची पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रीशेअर केली. या पोस्टमध्ये पती-पत्नीने एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यात गैर काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. प्रेमळ नात्याकडे चुकीच्या नजरेनं पाहणाऱ्यांनाही या पोस्टमधून सुनावण्यात आलं होतं.

ही पोस्ट शेअर करत सोनाक्षीने लिहिलं, ‘Dammmmn my future kids have no idea what’s coming their way. Buckle up kiddos (wherever you’ll are right now).’ म्हणजेच, माझ्या होणाऱ्या मुलांना कल्पनाही नाही की त्यांच्यासाठी पुढे काय वाढून ठेवलं आहे. तयार राहा मुलांनो. तिच्या या विनोदी प्रतिक्रियेमुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं.

Follow Us
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!
प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा लढा कायम, आता...
Pradip Purnekar Case : प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; पुर्णेकर कुटुंबियांचा लढा कायम, आता थेट...
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार;
NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक...