IPL 2021 : ‘या’ गोष्टीत मोहम्मद सिराज बुमराहच्याही ‘एक पाऊल पुढे!’, आशिष नेहराचं मोठं वक्तव्य

| Updated on: Apr 25, 2021 | 7:36 AM

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर मोहम्मद सिराजने कसोटी सामन्यात पदार्पण केले. मेलबर्न कसोटीत त्याने 5 बळी घेतले. टीम इंडियाच्या विजयात सिराजची महत्त्वपूर्ण भूमिका होती. (Ashish Nehra Said Skill Wise Mohamamed Siraj is Better than jasprit Bumrah)

1 / 5
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14 व्या सत्रातही सिराजने हा फॉर्म कायम ठेवला आहे. या मोसमात त्याने खेळलेल्या 4 सामन्यात 5 बळी घेतले आहेत. माजी भारतीय गोलंदाज आशिष नेहरा सिराजच्या गोलंदाजीने प्रभावित झाला आहे. मोहम्मद सिराजकडे बुमराहपेक्षा जास्त बोलिंगमधली कौशल्य आहेत, असं नेहराने म्हटलं आहे.

2 / 5
 आशिष नेहरा क्रिकबझशी बोलताना म्हणाला की, गेल्या तीन-चार वर्षात प्रत्येकजण जसप्रीत बुमराहबद्दल बोलत आहे. तो एक चांगला गोलंदाज आहे. याबद्दल कोणतीही शंका नाही. पण जर तुम्ही कौशल्याबद्दल बोलाल तर माझ्या दृष्टीने सिराज कधीही बुमराहपेक्षा उजवा आहे.

3 / 5
नेहरा पुढे बोलताना म्हणाला की, असे काही गोलंदाज आहेत जे तुम्ही टी -20 किंवा वनडेमध्ये खास करुन खेळवाल. पण सिराज प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याच्यात कौशल्याची कमतरता अजिबातच भासत नाही.

4 / 5
सिराजजवळ वेग आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्लो बॉल कसे टाकायचे हे माहित आहे. तो नवीन बॉल देखील स्विंग करू शकतो. त्याला त्याच्या फिटनेसकडे जास्त लक्ष द्यावा लागेल तसंच एकाग्र मनाने खेळावं लागेल, असंही नेहरा म्हणाला.

5 / 5
ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर मोहम्मद सिराजने कसोटी सामन्यात पदार्पण केले. मेलबर्न कसोटीत त्याने  5 बळी घेतले. टीम इंडियाच्या विजयात सिराजची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सिराजने आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 16 बळी घेतले आहेत. त्याने तीन टी -20 सामन्यात 3 विकेट्सही घेतल्या आहेत.