Ashok Saraf: त्याच्या वाकड्यात जायचं नाही जर गेलात तर…अशोक सराफ नाना पाटेंकराबद्दल काय म्हणाले?

Ashok Saraf On Nana Patekar: मराठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नानांबद्दलचा एक किस्सा नुकताच बोलून दाखवला आहे.

| Updated on: Nov 11, 2026 | 8:11 AM
1 / 5
अशोक सराफ यांचा 'आदी अनंत' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. संकर्षण कऱ्हाडे आणि अशोक सराफ हे या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. ते सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात गुंतलेले आहे.

अशोक सराफ यांचा 'आदी अनंत' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. संकर्षण कऱ्हाडे आणि अशोक सराफ हे या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. ते सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात गुंतलेले आहे.

2 / 5

नुकताच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नाना पाटेकरांसोबतचा एक किस्सा बोलून दाखवला आहे. अशोर सराफ म्हणाले," तो कधी माझं डोक दाबायचा, पाठ, हात वगैरे, मालिश करु द्यायचा तो मला, मी त्याला विचारायचो 'नाना हे काय?'

3 / 5

यावर तो मला म्हणायचा की तू तुझं काम कर, " मी त्याला म्हटलं की, तू हे काम असंच करायचं नाही, मी त्याचे तुला दोन रुपये देईन. तू मेहनत करतोस तर मोबदला मिळायला हवा ना." असं त्यांनी सांगितले.

4 / 5

"मी त्याला पाच रुपयेल ही द्यायचो, एकदा तर एका कार्यक्रमात त्यानं असं करायला सुरुवात केली, मग मी त्याला १० रुपये दिले. मग तो म्हणाला आपलं दोन रुपये ठरले होते तू १० का दिलेस?" असं अशोक सराफ यांनी बोलून दाखवले.

5 / 5

पुढे ते म्हणाले,"यावरुन समजते की नाना किती प्रामाणिक व्यक्ती होता, तो खूप सज्जन माणूस होता, पण जर तुम्ही त्याच्या वाकड्यात गेलात ना तर तुम्ही कामातून गेलात. "

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us