Ashok Saraf: त्यांनी डबल मिनिंगचे सिनेमा करायला सुरुवात केली म्हणून मग…दादा कोंडकेंबद्दल अशोक सराफ स्पष्टच काय म्हणाले?

Ashok Saraf On Dada Kondke: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आता दादा कोंडके यांच्यासोबत जास्त चित्रपट का केले नाही यावर आता मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Nov 08, 2026 | 3:16 PM
1 / 5
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि दादा कोंडके यांचा चाहतावर्ग मोठा आहे. नुकतंच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबत चित्रपट करण्याच्या अनुभवावर बोलून दाखवलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि दादा कोंडके यांचा चाहतावर्ग मोठा आहे. नुकतंच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबत चित्रपट करण्याच्या अनुभवावर बोलून दाखवलं आहे.

2 / 5

अशोक सराफ म्हणाले," मी त्यांच्यासोबत तीन चित्रपट केले. त्यानंतर त्यांचे डबल मिनिंग चित्रपट सुरु झाले. 'राम राम गंगाराम' या सिनेमानंतर त्यांचा जॉनरच बदलला. मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनीच मला घेतले नाही. "

3 / 5

पुढे अशोक सराफ म्हणाले, "बरं झालं त्यांनी मला घेतले नाही, नाहीतर मला काम करावं लागलं असतं ना, त्यांच्यासाठी त्यांनी मला बऱ्याच सिनेमासाठी विचारलं होतं, मला आता त्या सिनेमांचे नावही आठवत नाही."

4 / 5

"मी सिनेमातील भूमिका निवडण्यापूर्वी, फिल्मची कथा काय आहे, आधी मी कोणते पात्र साकारले, नवीन चित्रपटांत काय पात्र मिळणार आहे. आधीच्या पात्रापेक्षा खालचे पात्र असेल तर मी सरळ नाही म्हणायचो." असं अशो क सराफ म्हणाले.

5 / 5

'पांडू हवालदार', 'तुमचं आमचं जमलं' आणि 'राम राम गंगाराम' या सिनेमांत अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारलेली. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us