पाकिस्तानपुढे नवं संकट, असीम मुनीरच मोठा घात करणार? शाहबाज याचं टेन्शन वाढलं!

पाकिस्तान हा असा देश आहे जिथे लष्कराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या देशाचा लष्कर प्रमुख राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करतो. देशाचा पंतप्रधान कोण होणार? हे ठरवण्यातही लष्कर प्रमुखाचा मोठा हात असतो, असे तिथे म्हटले जाते.

| Updated on: Aug 17, 2025 | 9:10 PM
1 / 6
पाकिस्तान हा असा देश आहे जिथे लष्कराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या देशाचा लष्कर प्रमुख राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करतो. देशाचा पंतप्रधान कोण होणार? हे ठरवण्यातही लष्कर प्रमुखाचा मोठा हात असतो, असे तिथे म्हटले जाते. दरम्यान, सध्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुख या पदावर बसलेल्या असीम मुनीरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

2 / 6
गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानमध्ये मोठी उलथापालथ होणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांना लवकरच डिच्चू मिळणार असून त्या जागेवर पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर विराजमान होणार असल्याचे बोलेले जात होते.

3 / 6
दरम्यान, आता याच चर्चेवर खुद्द असीम मुनीर यानेच प्रतिक्रिया देऊन या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. आसिफ अली झरदारी यांना त्यांच्या पदावरून हटवले जाणार नाही. ती फक्त एक अफवा आहे, असं असीमने सांगितलंय.

4 / 6
जंग मीडिया समूहाचे स्तंभलेखक सुहैल वराईच यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. माझी नुकतीच आसीम मुनीर यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्यांनीच याबाबत माहिती दिली आहे, असे सुहैल यांनी सांगितले आहे. झरदारी यांना पदावरून हटवले जाणार असल्याची फक्त अफवा आहे, असे मुनीरने म्हटल्याचे सुहैल यांनी सांगितले आहे.

5 / 6
अशा प्रकारची अफवा पसवरण्याचे काम केले जात आहे. जे लोक सरकार आणि सैन्याचा विरोध करतात, ज्या लोकांना राजकीय अराजकता पसरावायची आहे, अशा लोकांकडून ही अफवा पसरवली जात असल्याचे मुनीर यांनी सांगितले आहे.

6 / 6
तसेच मला अल्लाहने देशाची रक्षा करण्याची जबाबदारी दिली आहे. याव्यतिरिक्त मला कशाचीही परवा नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.  याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीदेखील राष्ट्रपतीपदाबाबतच्या सर्व अफवा आहेत, असे सांगितलेले आहे. असे असे असले तरी पाकिस्तानात भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.