सोन्याचा दागिना म्हणजे संकट! या 3 राशीच्या लोकांनी कधीच करू नये ही चूक; अन्यथा होईल मोठा पश्चात्ताप!

देवी लक्ष्मीचे प्रतीक असले तरी 'या' ३ राशींच्या लोकांनी कधीही सोने घालू नये. अन्यथा या लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. सुख-समृद्धी दूर पळून जाते. तुमची रास तर नाही ना एकदा पाहा...

| Updated on: Feb 09, 2026 | 3:43 PM
1 / 6
भारतीय संस्कृतीत सोन्याला फक्त मौल्यवान धातू म्हणून नव्हे, तर देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्योतिषशास्त्रात सोन्याचा मुख्य संबंध देवगुरु बृहस्पती (गुरु) आणि सूर्य ग्रहाशी जोडला जातो. सोने धारण केल्याने कुंडलीत गुरु बलवान होतो, ज्यामुळे ज्ञान, ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती वाढते. पण ज्योतिषाचा एक महत्त्वाचा नियम असा आहे की, प्रत्येक धातू सर्वांसाठी शुभ नसतो. जसे औषध प्रत्येक व्यक्तीवर वेगळा परिणाम करते, तसे धातूंचेही राशीनुसार वेगळे प्रभाव पडतात.

2 / 6
सोन्याचा उष्ण स्वभाव असतो, जो शरीरातील उष्णता वाढवतो. ज्या राशींचा स्वामी मंगळ, सूर्य किंवा गुरु आहे, त्यांच्यासाठी सोने फायद्याचे ठरते. पण ज्या राशींचा स्वामी शनी, शुक्र किंवा बुध आहे, त्यांच्यासाठी सोन्याचा उष्ण प्रभाव त्यांच्या नैसर्गिक स्वभावाशी विसंगत जातो. यामुळे तणाव, आर्थिक अडचणी आणि प्रगतीत अडथळे येऊ शकतात.

3 / 6
कुंभचा स्वामी शनी आहे. शनी आणि गुरु यांच्यात समभाव असला तरी कुंभ ही वायु तत्त्वाची राशी आहे. सोन्याचा अतिवापर केल्यास भाग्यात अडथळे येऊ शकतात. खर्च वाढतो, कष्टाचे फळ मिळत नाही आणि जीवनात अनावश्यक अडचणी निर्माण होतात, असे ज्योतिषात सांगितले जाते.

4 / 6
मिथुनचा स्वामी बुध आहे. बुध आणि गुरु यांच्यात समतोल नसतो. मिथुन राशीच्या लोकांनी अतिशय जास्त सोने परिधान केल्यास त्यांची निर्णयक्षमता कमकुवत होऊ शकते. प्रगतीत अडथळे येतात, मानसिक अशांतता वाढते आणि आर्थिक स्थिरता धोक्यात येऊ शकते. सोने घालायचे ठरवले तर आधी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

5 / 6
वृषभचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिषात शुक्र आणि गुरु यांच्यात शत्रुत्वाचा भाव मानला जातो. सोने हे गुरुचे प्रतीक असल्याने वृषभ राशीच्या व्यक्तींनी जास्त सोने घातल्यास आर्थिक चढ-उतार येऊ शकतात. विशेषतः सोन्याची अंगठी किंवा चेन घातल्याने वैवाहिक जीवनात अनावश्यक वाद-विवाद वाढू शकतात आणि सुख-शांती बिघडू शकते.

6 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)