Avinash Narkar: आम्ही तुमच्या घरी येऊन…अविनाश नारकर पुन्हा संतापले, नेमकं काय म्हणाले?
Avinash Narkar: अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे कायमच चर्चेत असतात. त्यांचे रिल्स हे सतत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. पण त्यांना ट्रोल देखील केले जाते. आता या ट्रोलिंगवर अविनाश नारकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सतत रिल्स शेअर करताना दिसतात. अनेकदा ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करतात. पण चाहत्यांना ते आवडत नाहीत. त्या व्हिडीओवर अनेक घाणेरड्या कमेंट्स करतात. आता अविनाश नारकर यांनी एका मुलाखतीत ट्रोलर्सला सुनावले आहे.
अविनाश नारकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, कोणत्याही माध्यमाचा वापर अती झाला की शरीरावर आणि मनावर मोठा परिणाम होतो. सगळा समाजमाध्यम तुमच्या मानसिक गोष्टींशी निगडीत असतो. तुम्ही त्याचं गारूड तुमच्यावर घालून घेतलं तर त्याचा त्रास होणार."
पुढे अविनाश नारकर म्हणाले की, मला झालेला आनंद मला शेअर करायचा आहे. लोक काय म्हणतात अरे तुम्हाला झालेला आनंद तुम्ही शेअर करा ना, त्याच्यावर कशाला दाखवता. अरे पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे.
चिडून अविनाश नारकर म्हणाले की, तुम्हाला नाही बाघायचं तर असं केलं (स्वाइप) की लगेच जाणार आहे. आम्ही तुमच्या घरी येऊन नाचणार आहोत का? इतक सोप आहे. नाही आवडलं तर स्वाइप करा ना"
"शेवटी मनोवृत्ती आहे. आपण जेव्हा एका समाजात राहतो तेव्हा तिथे प्रत्येक माणूस वेगळा आहे. अनेक माणसं विकृतीकडे जाणारी असतातच. दुसऱ्याला नावे ठेवणे ही एक प्रकारची विकृतीच तर आहे" असे देखील अविनाश नारकर म्हणाले.