
सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र, हे भारतात दिसणार नाही. सूर्यग्रहण काळात काही कामे करणे टाळली पाहिजेत. चला जाणून घेऊया सूर्यग्रहण काळात कोणत्या गोष्टी करू नयेत.

हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी अन्न खाण्यास मनाई आहे. या काळात अन्न शिजविणे देखील अशुभ मानले जाते. सूर्यग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे टाळा.

हिंदू धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी भाजी कापू नये. याशिवाय या काळात कपडे शिवू नये.

असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. सूर्यग्रहण काळात चष्मा आणि दुर्बिणीशिवाय सूर्यग्रहण पाहू नका. यामुळे तुमची दृष्टी खराब होऊ शकते.

सूर्यग्रहणाच्या वेळी तुळशीला अजिबात हात लावू नये. ग्रहणानंतर सर्व झाडांवर गंगाजल शिंपडून त्यांना शुद्ध करा. यावेळी देवांना स्पर्श करणे देखील अशुभ मानले जाते.