
आजकाल कोणताही संदेश पाठवायचा असेल तर प्रत्येकजण व्हॉट्सअॅपवर लगेच संदेश पाठवतो. खरं म्हणजे व्हॉट्सअॅप हे आजघडीला संवादाचं सर्वात महत्त्वाचं साधन आहे. काही दिवसांसाठी व्हॉट्सअॅप बंद करायचं म्हटलं तर आपले आर्थिक नुकसानही होऊ शकते.

दरम्यान, तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर कोणताही संदेश पाठवताना विचार करणे गरजेचे आहे. कारण ही चुक तुम्ही केली तर तुमचे व्हॉट्सअॅपचे खाते थेट बंद होऊ शकते. महिन्याला किती व्हॉट्सअॅप खाते बॅन केले याचा एक रिपोर्ट व्हॉट्सअॅपकडून प्रत्येक महिन्याला जाहीर केला जातो.

तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप खाते सुरक्षित ठेवायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. काही चुका करणे टाळले पाहिजे. सर्वप्रथम समाजात द्वेष पसवरणारे मेसेज पाठवणे थांबवावे. ही चूक केल्यास तुमचे खाते बॅन होऊ शकते.

दुसरी चूक म्हणजे कोणतीही फेक न्यूज फॉरवर्ड करू नका. फेक व्यूज फॉरवर्ड केल्यावर समोरच्या व्यक्तीने रिपोर्ट केले तर तुमचे खाते थेट बॅन केले जाऊ शकते. अश्लील कंन्टेट फॉरवर्ड करणे तसेच शेअर करण्याची चूक कधीच करू नका. ही चूक आढळल्यास तुमचे खाते लगेच बॅन होऊ शकते.

कोणत्याही व्यक्तीला तिच्या परवानगीशिवाय कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करू नये. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला मेसेज करू नये. या दोन्ही चुकांमध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीने रिपोर्ट केले तर तुमचे खाते सलगेच बॅन होऊ शकते.