
बाबा वेंगा आज जरी हयात नसल्या तरी त्यांनी जगात भविष्यात काय होणार, याचं अगोदरच भाकित केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या भविष्यवाणीला खूप महत्त्व आहे.

विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भाकिताला जगभरात फार महत्त्व दिलं जातं.

आता बाबा वेंगा यांची एक भविष्यवाणी समोर आली आहे. संपूर्ण जगाला ज्याची प्रतीक्षा होती, त्याचीच भविष्यवाणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे ही घटना नेमकी कधी घडणार याबाबतही त्यांनी सांगितले आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार पृथ्वीवरच्या माणसांचा एलियन्सशी संपर्क होणार आहे. वेंगा यांच्या भाकितानुसार टाईम मशीच्या मदतीने 2288 साली हा संपर्क प्रस्थापित होईल. हे भाकित जर सत्यात उतरले तर संपूर्ण जग बदलून जाऊ शकते. कारण एलियन्सशी संपर्क झाला तर भविष्यात काहीही घडू शकते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.