
भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांना सगळेच ओळखतात. त्यांनी अशा काही वेगवेगळ्या भविष्यवाण्या करून ठेवलेल्या आहेत, ज्या आजही खऱ्या ठरताना दिसतात. पुढच्या काही वर्षांत नेमकं काय काय होईल? हेही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे.

बाबा वेंगा यांनी सांगितल्यानुसार 2025 साली युरोपची लोकसंख्या कमी होणार आहे. 2028 साली जगातील भूकबळी संपणार आहेत. तसेच मानव शुक्र ग्रहापर्यंत पोहोचणार आहे.

बाबा वेंगा यांनी सांगितल्याप्रमाणे 2046 सालापर्यंत कृत्रिम अवयवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाईल. तसेच 2066 सालापर्यंत अमेरिका पर्यावरणाचा विध्वंस करू शकणाऱ्या एका शस्त्राची निर्मिती करणार आहे.

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2088 साली एक भयंकर विषाणू येणार आहे. या विषाणूमुळे लोक लवकर वृद्ध व्हायला लागतील. 2111 सालापयंत रोबोटचे वर्चस्व फार वाढलेले असणार आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.