44 वर्षाची सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात? कुटुंबातील जवळचा व्यक्ती होणार नवरा?
44 वर्षांची ही लोकप्रिय अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात? कुटुंबातील जवळच्या व्यक्तीसोबत करणार लग्न? कोण आहे तो?

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या लग्नाबाबत नव्या चर्चा समोर येत आहेत. ‘देवसेना’ म्हणून घराघरात प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात आता मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अनुष्का शेट्टी सध्या 44 वर्षाची असून ती आता लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या लग्नाबाबत याआधीही अनेकदा अफवा पसरल्या होत्या.

विशेषतः बाहुबली चित्रपटातील सहकलाकार प्रभाससोबत तिचे नाव जोडले गेले होते. मात्र, दोघांनीही या अफवा फेटाळत आपण केवळ चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले होते.

नवीन रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शेट्टीचा होणारा जोडीदार हा चित्रपटसृष्टीशी संबंधित नसून एक बिझनेसमन आहे. तो तिच्या कुटुंबाचा जवळचा मित्र असल्याचेही सांगितले जात आहे.

मात्र, या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्वतः अनुष्का शेट्टीने या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अनुष्काच्या लग्नाच्या चर्चेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेसोबतच आश्चर्याचे वातावरण आहे. अनेक चाहत्यांनी तिला प्रभाससोबतच पाहण्याची कल्पना केली होती, त्यामुळे ही बातमी त्यांच्यासाठी थोडी अनपेक्षित ठरत आहे.

अनुष्का शेट्टीने ‘बाहुबली’ चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळवली. ‘देवसेना’ या तिच्या भूमिकेने तिला प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून दिले. ती शेवटची 2025 मध्ये ‘घाटी’ या चित्रपटात दिसली होती. अनुष्का शेट्टीच्या लग्नाबाबतच्या या बातम्या सध्या चर्चेत असल्या तरी अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.