‘इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वावरील डिजिटल चरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला..

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त, 'इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार' हे त्यांचे डिजिटल चरित्र लवकरच वाचकांच्या भेटीस येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पोस्टरचे अनावरण झाले. कीर्तिकुमार शिंदे यांनी लिहिलेले हे चरित्र बाळासाहेबांचा व्यंगचित्रकार म्हणून प्रवास आणि 'मार्मिक'कार ते शिवसेनाप्रमुख असा त्यांचा अदभूत जीवनपट उलगडणार आहे.

Updated on: Nov 17, 2025 | 11:14 AM
1 / 5
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13 वा स्मृतिदिन. त्यानिमित्त शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करतात. दरम्यान  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वावरील डिजिटल चरित्र लवकरच वाचकांच्या भेटीस येणार असून 'इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार' असे त्याचे नाव आहे.

2 / 5
शिवसेना(UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे येथील 'मातोश्री' निवासस्थानी, कीर्तिकुमार शिंदे लिखित 'इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार' या डिजिटल चरित्राच्या पोस्टरचे अनावरण झाले.

3 / 5
याची विशेष गोष्ट म्हणजे,  या पोस्टरमधील जे व्यंगचित्र आहे, ते  बाळासाहेब ठाकरे यांनीच रेखाटले होते.  शिवसेनेची स्थापना करण्यापूर्वी, बाळासाहेब ठाकरे हे स्वतः साप्ताहिक 'मार्मिक'चे संपादक होते, तेव्हाच 1960 साली त्यांनी त्यांच्या हातानेच हे व्यंगचित्र रेखाटले होते.

4 / 5
'इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार' हे आगळं-वेगळं डिजिटल चरित्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वावर आधारीत आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या चरित्राच्या पोस्टरचे अनावरण झाल्यानंतर आता ते सर्व वाचकांसाठी उपलब्ध होईल. लवकरच हे चरित्र वाचकांच्या भेटीसाठी येणार आहे. ते वाचण्यासाठी, बाळासाहेब ठाकरे यांचा व्यक्तिमत्व आणखी जाणून घेण्यासाठी वाचक खूप उत्सुक आहेत.

5 / 5
कीर्तिकुमार शिंदे यांनी लिहिलेलं हे चरित्र डिजिटल माध्यमात प्रसिद्ध होणार असून त्यात बाळासाहेबांची व्यंगचित्रकार म्हणून झालेली जडण-घडण, त्यांच्यावरचे कलात्मक व राजकीय प्रभाव, त्यांनी काढलेली ऐतिहासिक व्यंगचित्रं, त्यांच्या व्यंगचित्रकलेची वैशिष्ट्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 'मार्मिक'कार ते शिवसेनाप्रमुख हा त्यांचा अदभूत प्रवास यांबाबतची अत्यंत दुर्मीळ आणि रंजक माहिती असणार आहे.