मालिकाच शापित की आणखी काही..; 3 जणांनी घेतला जगाचा निरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलेलं आयुष्य
काळाच्या ओघात या मालिकेतील काही कलाकारांनी अभिनयापासून अंतर घेतलं, तर काही कलाकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू ठेवली. काही प्रमुख कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत ‘बालिका वधू’चं नाव आजही आवर्जून घेतलं जातं. 2008 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने बालविवाहासारख्या सामाजिक विषयाला केंद्रस्थानी ठेवत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आनंदी, जगिया, दादी सास आणि शिवराज या व्यक्तिरेखांनी घराघरात लोकप्रियता मिळवली.
अविका गौरने ‘बालिका वधू’मध्ये छोट्या आनंदीची भूमिका साकारत लहानपणीच प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेनंतर तिने ‘ससुराल सिमर का’सह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. तिने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं असून मनोरंजन क्षेत्रात आपली कारकीर्द पुढे नेली. 2025 मध्ये तिने मिलिंद चंदवानीसोबत लग्न केलं.
‘बालिका वधू’मध्ये शिवराज आलोक शेखरची भूमिका साकारून सिद्धार्थ शुक्लाला मोठी लोकप्रियता मिळाली. त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे तो घराघरात पोहोचला. पुढे त्याने ‘बिग बॉस 13’सह अनेक प्रोजेक्ट्स केले. मात्र, 2021 मध्ये वयाच्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं.
प्रत्युषा बॅनर्जीने मालिकेत मोठी झालेली आनंदी साकारली होती. या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा 5’ आणि ‘बिग बॉस 7’सारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली. मात्र, 2016 मध्ये वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी तिचं निधन झालं. तिच्या अकाली मृत्यूने टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला.
‘बालिका वधू’मधील कल्याणी देवी अर्थात दादी सास ही व्यक्तिरेखा अभिनेत्री सुरेखा सीकरी यांनी साकारली होती. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही भूमिका मालिकेतील सर्वाधिक लक्षात राहिलेल्या व्यक्तिरेखांपैकी एक ठरली. सुरेखा सीकरी यांचं 2021 मध्ये निधन झालं.
शशांक व्यासने डॉक्टर जगदीशची भूमिका साकारली होती. तो पुढे टीव्ही, ओटीटी आणि इतर प्रोजेक्ट्समध्ये काम करत राहिला. अविनाश मुखर्जीने बाल जगियाची भूमिका केली आणि पुढे ‘शक्ती’ तसेच ‘ससुराल सिमर का 2’मध्येही काम केलं.
तोरल रासपुत्राने 'बालिका वधू' मालिकेत आनंदीची भूमिका साकारली होती. ती तीन वर्षे या मालिकेचा भाग होती. ती गेल्या वर्षभरापासून टेलिव्हिजनपासून दूर आहे.
विभा आनंदने सगुणाची भूमिका साकारली होती. तिने तिची भूमिका इतकी उत्तम साकारली की मालिकेत तिचं अस्तित्त्व विशेष बनलं. मात्र ती गेल्या चार वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे.
सुमित्राची भूमिका शमिता बन्सलने साकारली होती. शमिता अनेक वर्षांपासून टेलिव्हिजनमध्ये चांगलं काम करत आहे. ती शेवटची 'भाग्य लक्ष्मी' या मालिकेत दिसली होती.
रुप दुर्गापालने 'बालिका वधू'मध्ये सांचीची भूमिका साकारली होती. ती 'गंगा', 'अकबर बिरबल', 'स्वरागिनी' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' यांसारख्या मालिकांमध्येही दिसली. रुप गेल्या चार वर्षांपासून टेलिव्हिजनपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर ती सक्रिय आहे.
अविनाश मुखर्जी 'बालिका वधू' या मालिकेत बालकलाकार म्हणून प्रचंड लोकप्रिय झाला. या मालिकेतील त्याने जगियाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने 'गुमराह', 'शक्ती', 'ससुराल सिमर का 2' यांसारख्या मालिकांमध्ये अभिनयकौशल्य दाखवलं.
गहनाची भूमिका साकारलेली अभिनेक्षी नेहा मर्दा आता एक उद्योजिका बनली आहे. फिटकू हा तिचा ब्रँड लोकप्रिय असून प्रत्युषा आता कोट्यवधींची कमाई करत आहे.
'बालिका वधू' या मालिकेत अनुप सोनी यांनी भैरो धर्मवीर सिंहची भूमिका साकारली होती. ते सध्या टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम करत आहेत.