World Cup 2023 आधी कॅप्टन शाकिब अल हसन याची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

वर्ल्ड कप तोंडावर असताना बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. शाकिब जागतिक क्रमवारीमध्ये नंबर एकचा ऑल राऊंडर खेळाडू आहे. गेल्या 17 वर्षांपासून तो बांगलादेश संघाचं प्रतिनिधित्त्व करत आहे.

| Updated on: Sep 29, 2023 | 12:41 AM
1 / 4
शाकिब अल हसन बांगलादेश संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पडत आहे. यंदाच्या वर्षीसुद्धा बांगलादेश संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरताना दिसेल. मात्र त्याआधी शाकिबने निवृत्तीबाबत पाहा काय घोषणी केलीये.

2 / 4
आता मी निवृत्तीचा विचार करत नाहीये, पण 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर क्रिकेटला रामराम करणार असल्याचं शाकिबने जाहीरपणे सांगितलं आहे.

3 / 4
2025 चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेटच्या दृष्टीने शेवटची आणि 2024 टी-20 विश्वचषक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दृष्टीने शेवटची असू शकते.  कदाचित मी एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमधून माझी निवृत्ती जाहीर करणार नाही, पण पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नाही, असंही शाकिब म्हणाला.

4 / 4
शाकिब अल हसननेही यावेळी सांगितले की, 2023 च्या विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या विनंतीवरूनच विश्वचषकासाठी कर्णधारपद स्वीकारल्याचं शाकिबने  म्हटंल आहे.