
आजकाल अनेक बँका, एनबीएफसी ग्राहकांना वेगवेगळ्या कामांसाठी कर्ज देतात. तुम्हाला घर घ्यायचे असेल तर गृहकर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तसेच तुम्हाला आणीबाणीच्या काळात पैशांची गरज असेल तर त्यासाठी तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता.

मात्र कर्ज घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या गोष्टींची काळजी न घेतल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. या बाबी कोणत्या आहेत, हे समजून घेऊ या..

कर्ज घेताना एखादी बँक तुम्हाला किती रुपये व्याजदर देत आहे, हे अगोदर जाणून घ्यावे. कर्ज घेताना वेगवेगळ्या बँकांचा व्याजदर जाणून घ्या. या व्याजदारांची तुलना करा. जो व्याजदर कमी आहे, त्याच बँकेकडून कर्ज घ्या.

कर्जच्या परतफेडीचा काळ किती आहे याचाही विचार केला पाहिजे. कारण कर्जाच्या परतफेडीचा काळ जास्त असेल तर तुम्हाला अधिक व्याज द्यावे लागते.

bank loan