प्रेमासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला, घटस्फोट होताच पुन्हा…दोन 2 लग्न केलेल्या अभिनेत्रीसोबत काय घडलं?

सिनेजगतात कधी काय होईल हे सांगता येत नाही. छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यातही बऱ्याच घटना घडतात. काही लकारांच्या करिअरशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप बोललं जातं.

| Updated on: Apr 22, 2026 | 12:11 PM
1 / 5
सिनेजगतात कधी काय होईल हे सांगता येत नाही. छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यातही बऱ्याच घटना घडतात. काही लकारांच्या करिअरशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप बोललं जातं. सध्या अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री तिने बदललेल्या धर्मामुळे चर्चेत आली आहे.

सिनेजगतात कधी काय होईल हे सांगता येत नाही. छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यातही बऱ्याच घटना घडतात. काही लकारांच्या करिअरशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप बोललं जातं. सध्या अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री तिने बदललेल्या धर्मामुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

चाहत खन्ना असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ही एक नावाजलेली अभिनेत्री असून तिचे लाखोंनी चाहते आहेत. तिने नुकतेच तिचा दुसरा घटस्फोट आणि मुस्लीम धर्म स्वीकारण्यावर खुलेपणाणे प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्यांदा घटस्फोट झाल्यानंतर आता तिने मुस्लीम धर्माचा त्याग गेला आहे.

3 / 5

मुस्लीम धर्माचा त्याग करून चहातने आता पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला आहे. तिने फरहान मिर्झा याच्यासोबत लग्न केले होते. हे लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. हा निर्णय पूर्णपणे माझ्या स्वत:चा होता, असे तिने सांगितले आहे.

4 / 5

तसेच मी धर्मनिरपेक्षा मताची व्यक्ती आहे. मी दिवाळी आणि इद असे सगळेच सण साजरे करते. मी माझ्या खुशीने मुस्लीम धर्म स्वीकारला होता. चाहतचे पहिले लग्न भरत नरसिंघानीसोबत 2006 साली झाले होते. त्यानंतर एका वर्षाने तिचा घटस्फोट झाला.

5 / 5

पुढे 2013 साली तिने फरहान मिर्झासोबत लग्न केले. तिने फरहाविरोधात 2018 साली लैंगिक आणि मानसिक अत्याचाराचे आरोप केले. त्यानंतर तिने त्याच्यापासूनही घटस्फोट घेतला. नंतर घटस्फोटानंतर तिने पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us